
कोल्हापूर, ९ मे (वार्ता.) – ‘अखिल भारतीय औषध विक्रेता संघटने’च्या वतीने कायदेशीर चौकटीबाहेर चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ औषध विक्री आणि खासगी आस्थापनांच्या अव्यावसायिक स्पर्धेच्या विरोधात २० मे या दिवशी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. यात राज्यातील १ लाख ४० सहस्र, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ४ सहस्र औषध दुकानदार सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्रल्हाद खवरे, संजय शेटे, दाजीबा पाटील, किरण जाधव, महेश सावंत, कैवल्य कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
१. औषध व्यवसाय हा ‘औषधे आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० नियम १९४५’ अंतर्गत चालतो; मात्र ‘ऑनलाईन’ औषध विक्रीच्या संदर्भात या कायद्यात कोणतेही स्पष्ट प्रावधान नसतांना देशभरात सर्रास अवैध विक्री चालू आहे. केंद्र सरकारने या संदर्भात २८ ऑगस्ट २०१८ या दिवशी एक सूचना काढली; मात्र त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही.
२. कोरोना कालावधीत अंतर्गत औषधे घरपोच करण्यासाठी सवलत देण्यात आली होती; मात्र कोरोना संपून ५ वर्षे उलटूनही ही सवलत रहित करण्यात आली नसल्याने त्याचा अपलाभ ‘ऑनलाईन आस्थापन’ घेत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे.
३. मोठ्या औषध आस्थापने २० ते ५० टक्क्यांपर्यंत औषध विक्रीत सवलत देत असल्याने १२ लाख ५० सहस्र औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या संदर्भात सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेवटी देशव्यापी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४. २० मे या दिवशी कुणाला अडचण आल्यास आम्हाला संपर्क साधावा. आम्ही त्वरित अत्यावश्यक औषध उपलब्ध करून देऊ, असेही मदन पाटील यांनी सांगितले.
| गर्भपात, शरीर सुदृढ बनवणारी उत्तेजक औषधे ही ‘ऑनलाईन’ मिळत असल्याने त्यांचा अपलाभ घेत गर्भपात केले जात आहेत. तरी या संदर्भात केंद्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन मदन पाटील यांनी या प्रसंगी केले. |
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !