Indian Army CDS : लेफ्टनंट जनरल एन्.एस्. राजा सुब्रमणी यांची ‘सी.डी.एस्.’पदी नियुक्ती !

(सी.डी.एस्. म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात् तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख)

लेफ्टनंट जनरल एन्.एस्. राजा सुब्रमणी

नवी देहली – भारत सरकारने लेफ्टनंट जनरल एन्.एस्. राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सी.डी.एस्.) म्हणून नियुक्ती केली आहे. ते संरक्षण व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही दायित्व सांभाळतील.

सध्याचे ‘सी.डी.एस्.’ अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे या दिवशी संपत आहे. लेफ्ट. जनरल सुब्रमणी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये सैन्य सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय सैन्यदलाचे उपप्रमुख आणि सेंट्रल कमांडचे ‘जीओसी – इन-सी’ (जनरल ऑफिसर कमान्डिंग-इन-चिफ) यांसारख्या पदांवर सेवा केली आहे. ते देशाचे तिसरे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असतील.