महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे – गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या दुसर्या टप्प्यात अडथळा ठरणारे ५२९ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभाग आणि घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून सिद्ध करण्यात आला आहे. या प्रस्तावावर अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे शहरातील कोठेही वृक्षतोडीस कोणतीही अनुमती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.
१. ‘शहरात मेट्रो, नदीकाठ सुधारणा आणि रस्ता रुंदीकरण अशा विविध प्रकल्पांमुळे अनुमाने २ सहस्र ५०० वृक्ष बाधित होणार आहेत. त्या संदर्भातील प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत.
२. शहरातील पर्यावरण जितके महत्त्वाचे आहे, तितकीच विकासकामेही महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जाईल.
३. वृक्षतोड अपरिहार्यच असल्यास ती केली जाईल. त्याचसमवेत बाधित वृक्षांचे पुनर्रोपण आणि नवीन वृक्षारोपण यांस प्राधान्य दिले जाईल.
४. शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटना यांनी ‘महाराष्ट्रदिना’निमित्त गणेशखिंड रस्त्यावर मानवी साखळी करत आंदोलन करत वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त