
कोचीन (केरळम्) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ज्येष्ठ धर्माभिमानी पत्रकार आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे लेखक श्री. कुमार चेलप्पन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. कोचीन येथील ‘इंडिया लाईव्ह’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयात ही भेट झाली. या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री श्रीराम लुकतुके आणि नंदकुमार कैमल उपस्थित होते. याप्रसंगी श्री. चेलप्पन यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे इंग्रजी भाषेतील दिव्य संक्षिप्त चरित्र’ भेट देण्यात आले. ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचायला हवे’, अशी भावना श्री. चेलप्पन यांनी या वेळी व्यक्त केली.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्र
श्री. कुमार चेलप्पन यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव

काही वर्षांपूर्वी श्री. चेलप्पन हे सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आले होते. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेल्या मार्गदर्शनाच्या स्मृती जाग्या झाल्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव श्री. चेलप्पन यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
याप्रसंगी श्री. कुमार चेलप्पन यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी श्री. श्रीराम लुकतुके यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे समितीच्या वतीने भारतभर चालणारे धर्मजागृतीचे प्रयत्न, ‘लव्ह जिहाद’विरोधी अभियान आणि राष्ट्र-धर्मरक्षणार्थ चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली, तसेच मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांचे रक्षण आणि सुव्यवस्था यांसाठी होत असलेल्या संघटित प्रयत्नांची माहितीही सांगण्यात आली. या हृद्य भेटीच्या वेळी ‘इंडिया लाईव्ह’ वृत्तवाहिनीचे मालक आणि मुख्य संपादक श्री. सुनील वडयार हेही उपस्थित होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड