शरिराने वैराग्य धारण करण्यापेक्षा मनाने पूर्णपणे विरक्त होऊन ईश्वराशी एकरूप व्हावे !

संत कबीर

‘मूँड़ मुड़ाये हरि मिले, सब कोई लेय मुड़ाय । 
बार-बार के मुंड़ते, भेड़ न बैकुण्ठ जाय ।।’ 

अर्थ : जर डोक्यावरील केस कापल्यावर ईश्वरप्राप्ती होत असेल, तर प्रत्येकाने आपल्या डोक्यावरील केस कापले असते; परंतु संपूर्ण अंगावरील केस (लोकर) पुनःपुन्हा कापल्यानंतरही कोणतीच मेंढी आजतागायत स्वर्गात गेल्याची नोंद नाही.

यांतून संत कबीर कर्मकांडातील व्यर्थता समजावतात. ‘केवळ केशवपनाने मोक्ष मिळायचा, तर माणसाआधी तो बकरीला मिळायला हवा. दाढी वाढवून मोक्ष मिळवायचा, तर तो आधी बोकडालाच मिळेल’, अशी निश्चिती देणारे कबीर माणसाच्या ‘शरिराने वैराग्य धारण करणे’ (तन जोगी), या वृत्तीवर प्रहार करून ‘मनाने पूर्णपणे विरक्त होऊन ईश्वराशी एकरूप होणे’ (मन योगी) होण्याचे समर्थन करतात.’

(साभार : ‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन’)