नवी अधिसूचना घोषित
(शक्तीपीठ महामार्ग वर्धा ते सिंधुदुर्ग असून तो विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणार आहे)

कोल्हापूर – राज्य सरकारने ‘शक्तीपीठ’ महामार्गासाठी नवी अधिसूचना घोषित केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील १०९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच चालू केली जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग ८ तालुक्यांतून जाणार असून ७८ गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. शेतकर्यांच्या विरोधामुळे शिरोळ तालुका वगळण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुके वगळून खानापूर, कडेगाव, पलूस अन् वाळवा तालुक्यांतील ३१ गावांचा नव्या अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे.
नागपूर येथील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा शक्तीपिठाचा मार्ग आहे. यापूर्वी पहिली अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषित करण्यात आली होती; मात्र या महामार्गाला नागरिकांचा विरोध झाल्याने आता नवी अधिसूचना घोषित केली आहे.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !