३१ मेपर्यंत दुसर्‍या महायुद्धातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत ! – मिलिंद तुंगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

सोलापूर – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सोलापूर जिल्ह्यातील दुसर्‍या महायुद्धातील लाभार्थ्यांनी शासनाच्या प्रचलित नियमानुसार मे २०२६ पर्यंत त्यांचे हयातीचे दाखले जमा करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र आणि अधिकोषाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाद्वारे मा करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले ३१ मेपर्यंत जमा होणार नाहीत, त्यांचे अनुदान मे २०२६ पासून बंद करण्यात येणार आहे. हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतर फरकासह अनुदान अदा करण्यात येईल. ‘ज्या लाभार्थ्यांचे निधन झाले आहे, अशा लाभार्थ्यांच्या अवलंबितांनी मृत्यूचा दाखला अर्जासह लवकरात लवकर कार्यालयात जमा करावा’, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.