सकल ब्राह्मण समाजाची मागणी

सातारा, ७ मे (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. सातारा येथेही सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘निंदनीय कृत्य करणार्या विकृत नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, पदाधिकारी प्रशांत आठवले, महेश कुलकर्णी, श्रीकांत वेलणकर, राजदीप माजगावकर, नितीन जोशी, संजय देसाई, प्रज्ञा लाटकर, दीपाली कुलकर्णी उपस्थित होत्या.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !