Nashik Corporate Jihad : ‘कॉर्पाेरेट जिहाद’चा विषय मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यापर्यंत पोचवणार ! – संतोष कुमार गंगवार, राज्यपाल, झारखंड राज्य

नाशिकमधील ‘कॉर्पाेरेट जिहाद’चे प्रकरण

डावीकडून राज्यपाल संतोष कुमार गंगवार, श्री. शंभू गवारे, श्री. चंद्रकांत रायपत, पूजा चौहान आणि श्री. सी.डी. सिंह

रांची (झारखंड) – महाराष्ट्रातील नाशिकमध्ये घडलेले ‘कॉर्पाेरेट जिहाद’चे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा. मीही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना आजच हा विषय पाठवतो, असे आश्वासन झारखंडचे राज्यपाल श्री. संतोष कुमार गंगवार यांनी येथे हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ सारख्या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय आस्थापनात ‘कॉर्पाेरेट जिहाद’ची घटना उडकीस आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभाव विरोधी प्रकरणांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे, विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्य अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, समितीच्या पूजा चौहान आणि श्री. सी.डी. सिंह उपस्थित होते.