
कर्णावती (गुजरात) – सहस्रो लोकांना विष देऊन मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथील न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. यामध्ये ३ आतंकवाद्यांची नावे असून ते इस्लामिक स्टेटशी संबंधित आहेत. डॉ. सय्यद अहमद मोहिउद्दीन, आझाद आणि महंमद सुहेल अशी त्यांची नावे असून त्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्या तिघांच्या विरोधात ‘जैव आतंकवाद’, म्हणजेच ‘बायोटेररिझम’चा आरोप ठेवण्यात आला आहे. अवैध कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र कायदा यांच्याशी संबंधित कलमांखाली दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
⚠️ Chargesheet Filed Against Terrorists For ‘Bioterrorism’
The chargesheet names 3 terrorists linked to the ISIS – Dr. Syed Ahmed Mohiuddin, Azad Shekh and Mohammed Suhail
They allegedly conspired to mix the deadly poison ‘ricin’ into food items and beverages at public places… https://t.co/ICHh3bAIWE pic.twitter.com/eWLlGG2O6B
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2026
तिघा आतंकवाद्यांनी सार्वजनिक ठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ आणि पेय यांमध्ये ‘रिसिन’ हे विष मिसळण्याचा कट रचला होता. या प्रकरणाची मूळ नोंद गुजरात आतंकवादविरोधी पथकाने केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये डॉ. मोहिउद्दीन याला अटक केल्यानंतर या प्रकरणाची वाढती व्याप्ती पहाता जानेवारी २०२६ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे ते हस्तांतरित करण्यात आले.
‘रिसिन’ म्हणजे काय ?

‘रिसिन’ हा एरंडीच्या बियांपासून मिळणारा अत्यंत विषारी पदार्थ आहे. याचा वापर ‘रासायनिक शस्त्र’ म्हणून करण्याचे आतंकवाद्यांचे उद्दिष्ट होते.
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !