
मुंबई – नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘‘नसरापूर येथील घटनेने मला भयानक चीड आली असून नराधामाला हाल हाल करून संपवा. सरकारने आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा दिली पाहिजे. अशा प्रकरणांत सरकार वारंवार जलद गती न्यायालयाचा उल्लेख करते; मात्र सरकारने ‘जलद गती’ची नक्की व्याख्या काय आहे ? हे स्पष्ट करावे. राजकीय सत्ताधुंदीमुळे आज समाजातील मूल्ये नष्ट होत आहेत. जुनी मूल्यव्यवस्था ढासळल्यानेच गुन्हेगारीत वाढ होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ अतिशय गंभीर गोष्ट आहे. यावर वेळीच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल…
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2026
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !