विश्व हिंदु परिषद आणि ‘हिंदु एकता आंदोलन’ यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर – पन्हाळा येथे असलेल्या एका मशिदीबाहेर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार विश्व हिंदु परिषद आणि ‘हिंदु एकता आंदोलन’ यांनी केली होती. या संदर्भात दोन्ही संघटनांचा पाठपुरावा चालू होता. या संदर्भात प्रशासनाने मोजणी केल्यावर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आले. यानंतर संबंधित मशिदीने हे बांधकाम स्वत:हून काढून घेतले.
या संदर्भात ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘पन्हाळगडावरील सदोबा तलावातील अनधिकृत मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी २७ जानेवारी २०२६ या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. या संदर्भात आमचा पाठपुरावा चालू होता. या संदर्भात तेथील मशिदीशी संबंधित लोकांचा अर्धवट अतिक्रमण काढून प्रशासन आणि समाज यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी ‘तेथील संपूर्ण अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम काढून टाकावे’, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करतो. वेळ पडली तर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते हे अतिक्रमण स्वतः जाऊन काढतील. विशाळगडाची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !