
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीमध्ये शुक्रवारच्या नमाजापूर्वी ज्ञानवापी आणि काशी विश्वनाथ मंदिर यांच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ च्या बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्ञानवापीजवळील एका भिंतीवर मधुबनी शैलीतील चित्र रेखाटण्यात आले होते. त्यावरून हा तणाव निर्माण झाला; मात्र तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौर्यापूर्वी हे चित्र रेखाटण्याचे काम करण्यात आले होते.
Opposition erupts over a saffron-coloured Madhubani painting near the disputed Gyanvapi in Varanasi.
Tensions flare as objections are raised by sections of the Muslim community over the artwork on a nearby wall.
Until the Supreme Court of India delivers a final verdict in the… pic.twitter.com/g1LtaNUkdO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2026
जरी नमाजाच्या वेळी कोणताही विरोध झाला नाही आणि नमाजपठण शांततेत पार पडले, तरी काही लोकांचे म्हणणे होते की, पूर्वी जी स्थिती होती, ती पालटण्याची आवश्यकता नव्हती. अशा कामांमुळे सामाजिक सलोख्यावर परिणाम होऊ शकतो.
भूमी वक्फची असल्याचा दावा करत तक्रार प्रविष्ट
वाराणसीचे ‘मुफ्ती-ए-बनारस’ मौलाना अब्दुल बातिन नोमानी यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, ही भूमी वक्फची आहे आणि त्यावर ज्ञानवापी समितीच्या अनुमतीविना चित्र रेखाटण्यात आले आहे. या संदर्भात अनेकदा अधिकार्यांशी संवाद साधला; पण कुणीही दखल घेतली नाही. मुफ्तींनी लेखी तक्रार प्रविष्ट केली असून चित्र हटवण्यासाठी ते पुन्हा अधिकार्यांची भेट घेणार आहेत.
पोलीस उपायुक्त (काशी) गौरव बन्स्वाल यांनी सांगितले की, चित्रामध्ये काहीही चुकीचे किंवा आक्षेपार्ह नाही. हे केवळ एक सांस्कृतिक चित्र आहे. ही भिंत ज्ञानवापीच्या हद्दीत येत नाही. जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी