ब्रह्मोस क्षेपणास्त्रांपेक्षा दुप्पट वेगवान
(हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या ५ पटींनी अधिक वेग असणारे)

नवी देहली – देश लवकरच ‘हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र’ आणि ‘हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र’ यांनी सुसज्ज होईल, अशी माहिती डी.आर्.डी.ओ.चे प्रमुख समीर कामत यांनी एका कार्यक्रमात दिली. ग्लाइड क्षेपणास्त्राची पहिली चाचणी लवकरच शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
"India will soon be equipped with 'Hypersonic Glide' and 'Hypersonic Cruise' missiles.They will be twice as fast as BrahMos missiles," says DRDO Chief Samir Kamat.#DefenceNews
PC: @news24tvchannel pic.twitter.com/ouBYDLZjDO— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2026
१. अत्याधुनिक ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रांचा वेग सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा दुप्पट असेल. यांच्या वैशिष्ट्यांमुळे जगातील कोणतीही संरक्षण प्रणाली त्यांना रोखू शकणार नाही. औपचारिक संमती मिळाल्यानंतर ५ वर्षांत ही क्षेपणास्त्र प्रणाली सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे.
२. भारत नौकाविरोधी क्षेपणास्त्रही विकसित करत आहे. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या तुलनेत अधिक वेगवान असेल. याची तिसर्या टप्प्यातील चाचणी याच महिन्यात केली जाणार आहे.
३. कामत यांनी स्पष्ट केले की ‘अग्नि-६’ क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी तांत्रिकदृष्ट्या संघ पूर्णपणे सिद्ध आहे. सरकारकडून हिरवा झेंडा मिळताच, आम्ही यावर काम चालू करू.
४. ‘अग्नि ६’ ही अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील सर्वांत आधुनिक ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल’ असेल. असे मानले जात आहे की, तिची मारक क्षमता १० सहस्र ते १२ सहस्र किलोमीटरपर्यंत असू शकते. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असेल, ज्यामुळे ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांना लक्ष्य करू शकेल.
५. रशियाकडे ‘झिरकॉन’ आणि ‘किंजल’ हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. चीनकडे ‘डीएफ्-झेडएफ्’ आहे, जे तैनात केले गेले आहे. अमेरिका या तंत्रज्ञानात थोडा मागे पडला आहे. अमेरिकेकडे टॉमहॉक तंत्रज्ञानाची ‘सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्रे आहेत; परंतु अलीकडच्या वर्षांत ‘एजीएम्-१८३ एआर्आर्डब्ल्यू’ सारखे तिचे हायपरसॉनिक प्रकल्प अयशस्वी ठरले आहेत.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण