चित्रपटाच्या नावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या शीर्षकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही अवमान होत नाही किंवा हे शीर्षक त्यांचा अवमान करणारे नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. चित्रपटाच्या नावातून ‘छत्रपती’ हा शब्द वगळल्याने शिवरायांचा अवमान होत असल्याचा आरोप करत ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन’ या संस्थेने प्रविष्ट केली होती. न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांनी ही याचिका फेटाळून लावत ही याचिका केवळ प्रसिद्धीच्या हेतूने प्रेरित असल्याचे निरीक्षण नोंदवले.
केवळ ‘राजा शिवाजी’ या नावामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात असून यामुळे महाराजांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य न्यून होत आहे. तरी या चित्रपटाचे नाव पालटून ‘छत्रपती राजा शिवाजी’ करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या सुनावणीत निर्मात्यांनी न्यायालयात सांगितले की, हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीच्या कालखंडावर आधारित आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांना ‘राजा शिवाजी’ असेच संबोधले जायचे, तसेच चित्रपटाच्या प्रारंभी यासंदर्भातील ‘संदेश’ देणारा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटाला चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने मान्यताही दिली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !