
कुपवाडा (काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी कुपवाडातील चांदीगाम येथील नष्ट केलेल्या एका मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर प्रशासनाकडून पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन करण्यात आली, अशी माहिती भाजपच्या जम्मू-काश्मीर शाखेने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. स्थानिक पातळीवर याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
१९९० च्या दशकात जिहादी आतंकवादामुळे ज्या कुटुंबांना काश्मीर खोर्यातून पलायन करावे लागले होते, त्या कुटुंबांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता.
जिहादी आतंकवाद्यांनी उद्ध्वस्त केले होते मंदिर आणि आश्रम !
‘काश्मिरी हिंदु’ नावाच्या एका ‘फेसबुक पेज’वर दिलेल्या माहितीनुसार, वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मंदिर आणि आश्रम यांवर ताबा मिळवला होता; त्यांनी केवळ या मंदिराची लुटालूट करून त्याला आग लावली नाही, तर तेथील सर्व वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. आता याच पवित्र स्थळी भूमीपूजन (पायाभरणी समारंभ) पार पडले असून लवकरच तेथे एक भव्य मंदिर आणि आश्रम याची उभारणी केली जाणार आहे.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक