वर्ष २०२२ नंतरची सर्वोच्च वाढ !
नवी देहली – कच्च्या तेलाचे दर १२५ डॉलर (अनुमाने १२ सहस्र रुपये) प्रति बॅरल इतके झाले आहेत. अमेरिका-इराण युद्धाच्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून आली आहे. वर्ष २०२२ नंतरची कच्च्या तेलाने गाठलेली ही सर्वोच्च पातळी आहे. पश्चिम आशियातील संघर्षात निर्माण झालेला तिढा, त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची भीती, तसेच इराणच्या बंदरांवर अमेरिकेकडून चालू असलेली नाकाबंदी इत्यादी कारणांमुळे ही प्रचंड वाढ झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (स्ट्रेट ऑफ होर्मुझ) पुन्हा उघडण्याविषयीचा इराणचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. जोपर्यंत एखादा सर्वसमावेशक अणूकरार होत नाही, तोपर्यंत ही नाकाबंदी कायम राहील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हवाई आक्रमणानंतर इराणने आखाती प्रदेशातील ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मार्गे होणारी सर्व सागरी वाहतूक थांबवली आहे; यातून केवळ स्वतःच्या जहाजांनाच वगळण्यात आले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही या महिन्यापासून इराणी जहाजांची नाकाबंदी चालू केली आहे. अमेरिकेची नाकाबंदी अशीच चालू राहिली, तर इराणच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा संकट आणखी गडद होऊ शकते.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांनी कमकुवत झाला असून रुपयाने ९५ चा टप्पा ओलांडला आहे. तेलाच्या किमतींमधील या सततच्या वाढीचा भारतावरही थेट परिणाम होत आहे.

दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी