
मुंबई – मी मीरा रोड येथील घटनेचा जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे अत्यंत सक्षम गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. ज्याने हे नीच कृत्य केले आहे, त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार सक्षम आहे. पोलिसांनी या घटनेमागे कोण आहे, या सर्वांचे धागेदोरे पडताळण्याची आवश्यकता आहे. धर्म विचारून वार करणे म्हणजे यांचा उद्दामपणा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. हा उद्दामपणा आता थांबवावा लागेल, असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
आस्थापनात कुणी जिहादी वृत्तीचा असेल, तर त्याला हाकलून द्या !
गोपीचंद पडळकर म्हणाले की, दिवसेंदिवस अशा घटना करण्याचे या लोकांचे नियोजन आहे. अशा आस्थापनांमध्ये जिहादी प्रवृत्तीची लोक ठेवलेच का आहेत ? महाराष्ट्रातील आस्थापनांनी धर्मांध जिहादी प्रवृत्तीचे कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक असतील किंवा वरच्या पदावर असतील, तर चौकशी करून त्यांना हाकलून दिले पाहिजे. अशा वृत्तीचा एकही माणूस आस्थापनामध्ये कामाला ठेवता कामा नये. ज्याने कुणी हे नीच काम केले आहे, त्याचे सालटे निघेल. त्याचे ज्याच्याशी संबंध असतील, त्याचेदेखील गुडघे सोलले जातील !
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !