साधकांसमोर ‘गुरुसेवेची तळमळ कशी असावी ?’, याचा वस्तूपाठ ठेवणारे सनातनचे २३ वे (व्यष्टी) संत पू. विनायक कर्वे (वय ८३ वर्षे)!

पू. विनायक कर्वे

‘नोव्हेंबर २०२५ मधील पहिल्या आठवड्यात पू. कर्वेमामा (पू. विनायक कर्वे, सनातनचे २३ वे (व्यष्टी) संत, वय ८३ वर्षे) २ – ३ दिवस कारवार येथील त्यांच्या घरी गेले होते. या कालावधीत घरातील कामे आटोपल्यानंतर ते बाहेर फिरायला जायचे आणि जिज्ञासूंना ‘सनातन पंचांगां’ची माहिती सांगून पंचांगांचे वितरण करायचे. त्या कालावधीत त्यांनी मराठी आणि कन्नड या भाषांतील एकूण ८० ‘सनातन पंचांगां’चे वितरण केले. या संदर्भात बोलतांना ते म्हणाले, ‘‘तळमळीने सेवा केली, तर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) साहाय्य करतातच !’’ याविषयी त्यांना आलेली अनुभूती सांगतांना ते म्हणाले, ‘‘एकदा माझ्याकडून एकाच ठिकाणी ५ पंचांगांचे वितरण झाले. असे ३ – ४ ठिकाणी घडले. मी पंचांगांच्या वितरणाची सेवा करतांना काही परिचित व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने अर्पणही दिले.’’

श्री. दीपक छत्रे

नेहमीप्रमाणे ‘परम पूज्यच कर्ता-करविता आहेत’, हे सांगायला पू. कर्वेमामा विसरले नाहीत. पू. कर्वेमामांच्या या कृतीतून ‘तळमळीने सेवा केली, तर ईश्वराचे साहाय्य मिळतेच !’, हे मला शिकायला मिळाले. गुरुसेवेसाठी तत्पर असणार्‍या ८३ वर्षांच्या पू. कर्वे मामांची गुरुसेवेची तळमळ आम्हा सर्वांसाठी एक वस्तूपाठच आहे.’

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (नोव्हेंबर २०२५)