म्हैसुरू येथे चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा दिला आदेश

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘कांतारा’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कनिष्ठ देवतेचा अवमान केल्याच्या प्रकरणी अभिनेते रणवीर सिंह यांची विनाअट क्षमायाचना स्वीकारली आहे. यासमवेतच न्यायालयाने त्यांना ४ आठवड्यांत म्हैसुरूमधील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा आदेशही दिला आहे.
काय आहे प्रकरण ?गोव्यातील ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कांतारा : चॅप्टर १’ या चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात रणवीर सिंह यांनी चित्रपटातील ‘दैवा’ या पात्राची नक्कल केली होती. त्याने दैवाचा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केला होता. या विधानामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून रणवीर सिंह यांच्या विरोधात कर्नाटकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर रणवीर सिंह यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रहित करण्याची मागणी केली होती. २५ एप्रिल या दिवशी रणवीर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून विनाअट क्षमा मागितली.
तक्रारदार प्रशांत मेथा यांनीही न्यायालयाला सांगितले की, रणवीर यांनी आता मनापासून क्षमा मागितली असल्याने हे प्रकरण संपवण्यास त्यांची हरकत नाही.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !