
नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ मे या दिवशी सिंहस्थ कुंभपर्वाच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. विकासकामांच्या सूचीत नाशिकचा बाह्य रिंगरोड (शहराभोवती वर्तुळाकार पद्धतीने बांधलेला रस्ता), तसेच त्र्यंबकेश्वर दर्शनपथ यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ६ मे या दिवशी नाशिक दौर्यावर येत आहेत. त्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभपर्वाशी संबंधित विविध प्रकल्पांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

सिंहस्थ कुंभपर्वात येणार्या साधू-महंतांसाठी वेळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासह आखाडा परिषदेच्या सूचना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भात १३ आखाड्यांच्या प्रमुख साधू-महंतांची बैठक प्रस्तावित आहे. नाशिकमध्ये ६ मे या दिवशी ही बैठक घेण्याची सिद्धता प्रशासनाने चालू केली आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे