सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही ! – हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

  • पुणे येथील ऐतिहासिक सारसबागेच्या होणार्‍या हिरवेकरणाविरुद्ध हिंदुत्वनिष्ठांची निदर्शने

  • बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची मागणी

(‘शाहीनबाग’ हा देहलीतील मुसलमानाबहुल भाग असून तेथे मुसलमानांनी एकत्र येऊन भररस्त्यावर अनेक महिने आंदोलन करून इतर सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले होते.)

पुणे – समस्त पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या, तसेच ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या सारसबाग अन् त्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवून ठेवण्याच्या सूत्रावरून सारसबाग समोरील पदपथावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि ४०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पेशवेकालीन वारसा लाभलेल्या या पवित्रस्थळाचे संरक्षण करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ‘रमझान ईद’च्या दुसर्‍या दिवशी या परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कुणाच्या दबावामुळे ही अनुमती मिळाली ?, असा संतप्त प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

‘सारसबागेत होत असलेल्या धार्मिक अतिक्रमणाचा जाहीर निषेध’, ‘सारसबागेत धार्मिक अतिक्रमणाला अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा’, ‘धार्मिक क्षेत्राचे पावित्र्य नष्ट करणार्‍यांचा धिक्कार असो’, ‘हिंदूंच्या धार्मिक क्षेत्राचे हिरवेकरण सहन करणार नाही’, ‘सारसबागेमध्ये होणारा लँड जिहाद सहन करणार नाही’ अशा जोरदार घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

२२ मार्च २०२६ या दिवशी सारसबाग येथे गर्दी जमली होती. येथे जमण्यास अनुमती देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, तसेच मंदिर परिसरात अहिंदु सामूहिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी बंदी घालावी, अशा मागण्या उपस्थित आंदोलकांनी केल्या. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासन अकार्यक्षम आहे का ? – संपादक) २७ मे २०२६ या दिवशी असणार्‍या ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर सारसबाग परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने आधीच प्रतिबंधात्मक आदेश लागू करावेत, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले जाणार आहे. आंदोलकांच्या मागण्यांची नोंद न घेतल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याची चेतावणीही उपस्थितांनी दिली.

सहभागी मान्यवर

या आंदोलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचा’चे श्री. विद्याधर नारगोलकर, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’चे श्री. दयानंद बंडगर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, अधिवक्ता दत्तात्रय देवळे, फुरसुंगी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नीलेश पवार, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि समाज प्रबोधनकार सुशांत गाडे, हिंदुराष्ट्र समन्वयक समितीचे पुणे जिल्हा संयोजक सचिन घुले, जालना येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वानंद कुलकर्णी, सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी राकेश  गायकवाड, तसेच भाजपच्या सीमा लिमये यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुणे येथील ऐतिहासिक सारसबागेच्या हिरवेकरणाविरुद्ध केलेल्या आंदोलनातील मान्यवरांचे विचार !

पुणे – येथील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या सारसबाग अन् त्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवून ठेवण्याच्या सूत्रावरून सारसबाग समोरील पदपथावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठांनी त्यांचे विचार मांडले.

श्री. दादा वेदक यांनी ‘हिंदु जनजागृती समिती उल्लेखनीय कार्य करत आहे’,’ असे सांगून समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

मंदिरांचे पावित्र्य भंग होईल, अशी घटना खपवून घेणार नाही ! – दादा वेदक, केंद्रीय सहमंत्री आणि अखिल भारतीय सत्संग प्रमुख, विश्व हिंदु परिषद

‘सारसबागेच्या परिसरातील गणपति मंदिर पेशवेकालीन असतांना धर्मांध मुसलमानांना येथे येण्यास कुणी अनुमती दिली ?’ असा प्रश्न प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांना विचारायला हवा. मंदिरांचे पावित्र्य भंग होईल, अशी कोणतीही घटना घडता कामा नये. असे झाल्यास हिंदू त्याच भाषेत धर्मांधांना उत्तर देतील.

मुसलमानांची विकृत मानसिकता मोडून काढण्यासाठी हिंदु  राष्ट्र हाच पर्याय ! – सुशांत गाडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि समाज प्रबोधनकार 

सरकार, नगरसेवक आणि महापौर हिंदूंचे असतांना सारसबागेच्या परिसरात मुसलमानांना जमण्यास अनुमती दिलीच कशी ? सारसबागेच्या परिसरातील त्यांचे अतिक्रमण हा ‘भूमी जिहाद’चा प्रकार आहे. त्यांची मानसिकता मोडून काढण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे.

सारसबागेतील गणपति मंदिर हिंदु धर्माच्या आस्थेचे केंद्र ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज 

सारसबागेतील गणपति मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे; पण या आस्थेच्या केंद्रावर धर्मांधांचे लक्ष आहे. यावरील अतिक्रमण हा भूमी जिहादचा प्रकार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त वारकरी संघटना मिळून आम्ही प्रशासनाला चेतावणी देतो की, असा प्रकार पुन्हा घडल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाहीत.

ट्रस्टने मुसलमानांना अनुमती का दिली ? – दत्तात्रय देवळे, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती 

सारसबाग आणि आजूबाजूचा परिसर ट्रस्टकडून चालवला जातो अन् त्यावर देखरेख ठेवली जाते. असे असतांना ट्रस्टने मुसलमानांना अनुमती का दिली ?

सारसबागेचे शाहीनबाग होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – पराग गोखले, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती 

सारसबाग मंदिर हे पेशवेकालीन आहे. देहलीतील ‘शाहीनबागे’सारखेच सारसबागेचे होणार का ? प्रशासनाने मुसलमानांना येथे एकत्र येण्यास अनुमती कशी दिली ? हे असेच चालू राहिल्यास एक दिवस येथील गणेशमूर्ती हटवण्यासाठीही मुसलमान मागे-पुढे पहाणार नाहीत. हे होऊ नये, यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी सतर्क होऊया.

सारसबागेतील पदपथावर केलेल्या आंदोलनानंतर विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सामूहिक आरती केली.

‘जशास तसे’ उत्तर देऊया ! – स्वानंद कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जालना 

राजकारणी लोक हिंदूंना एकत्र येऊ देत नाहीत; पण युवा पिढीने एकत्र यायला हवे. त्यांना एकत्र करणे ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंवरील अन्यायाला ‘जशास तसे’ उत्तर द्यायला हवे. गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील.

सर्वांनी एकजुटीने कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा ! – सीमा लिमये, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी, भाजप

प्रशासन, राजकीय नेते, बलाढ्य संघटना यांनी हिंदूंच्या पाठीशी उभे रहायला हवे. मांसाहार करून मंदिरांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सारसबागेचा गणपति हा मानाचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. याला कुठेही तडा जाऊ देणार नाही. युवा पिढीने सक्रियपणे सहभागी व्हावे. सर्वांनी एकजुटीने कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत.

देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा ! – राकेश गायकवाड, सकल हिंदु समाज, पदाधिकारी 

सारसबाग परिसरात आंदोलन घ्यावे लागले, हीच शोकांतिका आहे. देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. मंदिरांमध्ये अतिक्रमणाच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रयत्नरत राहूया.

हिंदूंना अडचण होईल, असे कृत्य सहन करणार नाही ! – दयानंद बंडगर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच 

मंदिरांचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र हिंदूंना अडचण होईल, असे कृत्य कदापी सहन करणार नाही.

सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे का ? असा प्रश्न पडतो ! – सचिन घुले, हिंदु राष्ट्र समन्वयक समिती, पुणे जिल्हा संयोजक 

गेल्या काही दिवसांपासून हिंदूवर अन्याय-अत्याचार होत आहेत. हे सर्व पाहून ‘सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे का ?’ असा प्रश्न पडतो. मुसलमानांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, मात्र हिंदूंवर कारवाई विनाविलंब होते. हे सर्व प्रकार थांबण्यासाठी आता क्रियेला प्रतिक्रिया झालीच पाहिजे.

जागृत हिंदूंनी एकत्र यावे ! – नीलेश पवार, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, हडपसर 

गड, दुर्ग आणि मंदिरे यांचा परिसर मुसलमान कह्यात घेत आहेत. सारसबागेतील मंदिरात येऊन तेथील पावित्र्य नष्ट करत आहेत. जागृत हिंदूंनी एकत्र येऊन मुसलमानांना प्रतिबंध केल्यासच मज्जाव करावा, तरच असे प्रकार थांबतील.

आंदोलनाला उपस्थित नागरिकांच्या प्रतिक्रिया ! 

१. भारताचा पाकिस्तान न होण्यासाठी संघटित व्हायला हवे.

२. आपण सर्वजण जातीपातींत अडकलो आहोत. हिंदूंना धर्मशिक्षण द्यायला हवे. संघटित होणे काळाची आवश्यकता आहे.

३. आपले घर आणि समाज येथे हिंदु धर्माविषयी जनजागृती व्हायला हवी. आपणच आपली संस्कृती वाचवायला हवी.

४. विदेशी नागरिक हिंदु संस्कृती आत्मसात करतात; मात्र आपलेच काही राजकारणी लोक मूठभर मतांसाठी अल्पसंख्यांकांना गुपचूप पाठिंबा देतात. सर्वांनीच हिंदु संस्कृती जोपासली पाहिजे; कारण हिंदु धर्मासारखा जगात दुसरा धर्म नाही.

संपादकीय भूमिका

अशी मागणी आणि निदर्शने का करावी लागतात ? प्रशासनातील अधिकारी झोपले आहेत का ?