
पनवेल – येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रिक्शांवर मराठी भाषेचे स्टिकर लावण्याची मोहीम राबवली आहे. १ मेपासून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्शाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मनसेने हा प्रयत्न केला.
‘मी मराठी बोलतो’, ‘मला मराठी समजते’, ‘माझ्या रिक्शात बसा’, अशा आशयाचे स्टिकर रिक्शावर लावण्यात आले आहेत. प्रवाशांनीही मराठी भाषिक चालकांच्या रिक्शांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.
मराठीचा छोटा शब्दकोश बाळगण्यास प्रारंभ !
काही ठिकाणच्या रिक्शाचालकांनी मराठी बोलता यावे, यासाठी मराठीचा छोटा शब्दकोश बाळगण्यास प्रारंभ केला आहे, तर काही ठिकाणी मुसलमान रिक्शाचालकांनी या निर्णयाचा निषेध करत मराठी बोलणे जमणार नसल्याने आपापल्या शहरांत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच