एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचे प्रकरण

सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’कडून (एन्.सी.ई.आर्.टी.कडून) मराठा साम्राज्याचा नकाशा ८ वीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येथे श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या वेळी एन्.सी.ई.आर्.टी.चा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून कृती केव्हा करणार ? – संपादक)
या वेळी श्रीमंत वृषालीराजे भोसले म्हणाल्या, ‘‘मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत् न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. छत्रपती घराण्याच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात येणार असून केंद्र सरकारला १५ दिवसांची समयमर्यादा देत आहोत. हा केवळ अभ्यासक्रमाच्या विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर घाला घालण्याचा प्रकार केंद्र सरकारने थांबवावा.’’
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !