
पुणे – भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेणारे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर नामदेव धोटे आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका संदीपान घुले यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
तक्रारदाराने ‘पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरणा’कडे (‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडे) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आवश्यक होता. हा अहवाल देण्यासाठी प्रथम अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २ लाख रुपये देण्याचे मान्य केले. ही लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !