तहसीलदारांना निवेदन !

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) – शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळी यांच्याविषयी केलेल्या अत्यंत हीन अन् वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. संप्रदायाची जाणीवपूर्वक अपकीर्ती केल्याच्या निषेधार्थ समस्त वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळी यांच्या वतीने तहसीलदार अंकिता दहिभाते यांना २४ एप्रिल या दिवशी निवेदन देण्यात आले. ‘लवांडे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
उपस्थित मान्यवर
या वेळी ह.भ.प. रामेश्वर महाराज, वारकरी संघाचे सचिव ह.भ.प. कृष्णा लहाने, माणिक महाराज, ह.भ.प. नामदेव महाराज पल्हाळ, ह.भ.प. वामन महाराज, ह.भ.प. अजबराव महाराज मिरगे, ह.भ.प. सदाशिवशास्त्री मंगरूळकर, ह.भ.प. दिगंबर दादा, ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ, ह.भ.प. संदीप महाराज काकडे, ह.भ.प.शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत, ह.भ.प. गणेश महाराज, ह.भ.प. समाधान महाराज बसंते, ह.भ.प. भगवान महाराज भोरकडे, ह.भ.प. नारायण महाराज, ह.भ.प. पुंडलिक महाराज आणि वारकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, लवांडे यांनी संप्रदायातील महाराजांना ‘प्रतिगामी’ संबोधून त्यांच्या ‘आचार्य’ या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या पदव्यांविषयी असे विधान करणे हे त्यांच्या अल्प ज्ञानाचे लक्षण आहे. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा जाणीवपूर्वक आरोप करून त्यांनी संतांच्या मूळ शिकवणीचाच अवमान केला आहे. महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचे वारकरी संप्रदायाने स्पष्ट केले आहे. लवांडे यांच्या विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून वारकरी परंपरेला कलंक लावण्याचा हा संघटित प्रयत्न आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !