इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थीसाठी पुढे पुढे करणार्या पाकला इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा टोला !

तेहरान (इराण) – जर पाकिस्तानची इच्छा असेल, तर अफगाणिस्तानशी त्याच्या चालू असलेल्या संघर्षात इराण मध्यस्थ बनून त्याला साहाय्य करू शकतो, अशा शब्दांत इराणने अमेरिकेसमवेतच्या युद्धात मध्यस्थी करणार्या पाकला टोला लगावला आहे.
🔥 Diplomatic Reverse Swing: Iran Trolls Pakistan
Iranian FM Abbas Araghchi took a sharp jibe at Pakistan after its comments on the Iran-US issue.
“If Pakistan wishes, we can facilitate talks with Afghanistan!”
Araghchi turned Islamabad’s own rhetoric back on them, saying… pic.twitter.com/7iSeJVeaH5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2026
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, ‘जर दोन्ही देशांची (पाक-अफगाणिस्तान) इच्छा असेल, तर इराण त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी साहाय्य करायला सिद्ध आहे.’ पाकिस्तानचीच वाक्ये त्यांच्यावर उलटवत अराघची म्हणाले की, ‘कोणत्याही समस्येच्या निराकरणासाठी चर्चा आणि प्रादेशिक सहकार्य, हाच एकमेव मार्ग आहे.तणाव वाढण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही देशांनी मुत्सद्देगिरीच्या मार्ग अवलंबवला पहिजे.’
पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध !
वर्ष २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर पाकिस्तानसमवेतचा त्यांचा तणाव वाढला आहे. पाकिस्तानला तालिबानला स्वतःच्या हातचे बाहुले बनवून त्यांचा वापर भारताच्या विरोधात करायचा होता; परंतु तालिबान त्यांच्या जाळ्यात अडकण्याऐवजी स्वतःच्या स्वतंत्र धोरणाने चालू लागला. ज्यामुळे दोघांमधील संबंध बिघडले. पाकिस्तानचा असा आरोप आहे की, अफगाणिस्तान सरकार (म्हणजेच तालिबान) त्यांच्याकडे सक्रीय असलेल्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना आश्रय देते. याच गोष्टीला आधार बनवून पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानमध्ये बाँबफेक करत असतो. यामुळे अफगाणिस्तानवर राज्य करणार्या तालिबानशी त्यांचे वैर निर्माण झाले आहे. यावरून दोघांमध्ये सीमेवर चकमक चालू असते.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !