जे लोक गोमांस खातात, ते डुकराचे दूध पितात का ? – Yogi Adityanath

गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – गायीचे दूध हे निसर्गाचे आणि दैवी देणगीसारखे आहे. जे लोक गोमांस खातात, ते डुकराचे दूध पितात का ? जगात कुणी गाय मानो अथवा न मानो, दूध मात्र गायीचेच वापरले जाते. लहान मूलही आईचेच दूध पिते-हे निसर्गाने दिलेले वरदान आहे, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. येथे आयोजित ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीला उच्च स्थान !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. राम यांना ‘कौशल्येचा पुत्र’, कृष्ण यांना ‘यशोदेचा लाडका’ म्हणून संबोधले जाते, तर भीष्म आणि अर्जुन यांनाही त्यांच्या मातांशी जोडून ओळखले जाते. यातून मातृशक्तीचे महत्त्व दिसून येते. मथुरा आणि वृंदावन येथे ‘राधे-राधे’ असा उच्चार केला जातो, तर काशी येथे ‘नमः पार्वतीपतये’ असा घोष होतो, असेही त्यांनी नमूद केले.