‘१२.४.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा २७ वा वर्धापनदिन होता. या दिवशी मी आणि सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) बोलत असतांना माझ्याकडून सहजतेने ‘आपले दैनिक’, असे म्हटले गेले. ते ऐकून सौ. स्वातीताई यांना तत्क्षणी पुढील काव्यपंक्ती सुचल्या.

१. दैनिक ‘सनातन प्रभात’ आमच्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे ।

सर्व काही सांगते ते खात्रीचे ।। १ ।।
म्हणूनच दैनिकाची होता भेट ।
मिळतात सार्या प्रश्नांची उत्तरे थेट ।। २ ।।
काय सांगावी आमच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची महती ।
ज्ञानरूपे तयातून गुरुदेव (टीप) भेटती ।। ३ ।।
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
२. सौ. स्वाती शिंदे यांना स्फुरलेल्या काव्यपंक्ती ऐकून साधकाचे झालेले चिंतन
२ अ. सौ. स्वाती शिंदे यांना वाटत असलेली दैनिक ‘सनातन प्रभात’बद्दलची आपुलकी : यानंतर सौ. स्वातीताई यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणार्या सर्व साधकांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. या ओळींमध्ये व्यक्त झालेला भाव हा केवळ शब्दांपुरता मर्यादित नसून त्यातून स्वातीताई यांना वाटणारी दैनिक ‘सनातन प्रभात’बद्दलची आपुलकी व्यक्त होते.

२ आ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्याप्रती कृतज्ञताभाव कसा असावा !’, हे सौ. स्वाती शिंदे यांच्या बोलण्यातून लक्षात येणे : मी स्वतः प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करत असलो, तरी या प्रसंगाने मला अंतर्मुख केले. ‘आपण जी सेवा प्रतिदिन करतो, ती अनेक वेळा आपल्या सवयीची होऊन जाते’, असे मला वाटले. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्याप्रती कृतज्ञताभाव कसा असावा !’, हे मला स्वातीताई यांच्या बोलण्यातून लक्षात आले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वेगळे, अधिक व्यापक आणि आध्यात्मिक स्वरूप माझ्यासमोर उलगडले गेले.
‘वर्धापनदिनाच्या निमित्ताने सौ. स्वातीताईंना सुचलेल्या काव्यपंक्तींमुळे माझा दैनिक ‘सनातन प्रभात’शी असलेला जिव्हाळा अधिकच दृढ झाला’, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते’, त्याबद्दल मी तिन्ही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणी आणि सौ. स्वातीताई यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२६)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !