
‘केवळ कर्मसंन्यासामुळे सिद्धी, म्हणजे मुक्ती नाही. श्रीकृष्णाला सांगायचे आहे की, ज्याला ज्ञान नाही, त्याला कर्म सोडणे (कर्मसंन्यास) अंगलटी येईल. सिद्धी दूरच; पण अधःपात होईल. कर्मसंन्यास करावा लागत असेल, कर्मे टाकावी लागत असतील, सोडावी लागत असतील, तर समजावे की, ‘फळ कच्चे आहे.’ अजून पिकायचे आहे. फळ पिकेपर्यंत कर्मे करावीत. फळ पिकले की, ‘ते आपोआप गळणारच.’ आत्मज्ञान झाले, ब्रह्मवेत्ता झाला की, ‘कर्मे आपोआप सुटतात.’ ती सोडावी लागत नाहीत. ज्याला कर्मसंन्यास करावा लागतो, त्याला ‘सिद्धी’ नाही. ज्याचा कर्मसंन्यास आपोआप होतो, तो ‘सिद्ध’च असतो. तो मुक्तच असतो किंबहुना असेही म्हणता येईल की, ‘जो मुक्त आहे, सिद्ध आहे, त्याचाच कर्मसंन्यास होतो.’
‘मृत्यू हा जीवनाचा सारभूत (सर्वाेत्तम) गंध आहे. जीवन आणि मृत्यू हे वेगळे नाहीत. जगणे हा मृत्यू आहे आणि मृत्यूच जगणे आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक, ‘घनगर्जित’, १ डिसेंबर २०२१)
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !
उपचारांसाठी रुग्णालयात रहातो, तसे आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंच्या आश्रमात रहावे !