पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या हस्ते प्रारंभ !

सांगली, २१ एप्रिल (वार्ता.) – अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती यांचे औचित्य साधून येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले. ‘जय परशुराम, जय शिवराय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेचा प्रारंभ श्री गणपति मंदिरातून करण्यात आला. या वेळी हिंदु संस्कृतीचा जयघोष करत सांगलीसह आसपासच्या गावांतून परशुरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रा चिंतामणराव महाविद्यालय परिसरात पोचल्यानंतर तेथे परशुरामाचा जन्मकाळ सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्फूर्ती चौक परिसरात अचानक पावसासह गारपीट चालू झाली; मात्र महिला आणि बालके यांसह सर्वांनी शोभायात्रा पुढे चालू ठेवली. भगवे फेटे आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या परशुरामभक्तांच्या एकजुटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेवटी महाप्रसाद देण्यात आला.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !