
अहिल्यानगर – महिला अत्याचाराच्या प्रकरणातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना न्यायालयाने ‘स्टँडिंग वॉरंट’ (कायमस्वरूपी अटक आदेश म्हणजे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत तो सक्रीय असतो.) बजावले आहे. तरीही आरोपीचा शोध लागत नाही. आता कळमकर यांना थेट न्यायालयात उपस्थित होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात उपस्थित न झाल्यास ‘पसार’ म्हणून घोषित करण्यात येईल. त्यांच्या स्थायी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा जाहीरनामा न्यायालयाने दिला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
१. कळमकर यांनी पुणे जिल्ह्यातील एका महिलेला नोकरीचे आमीष दाखवून तिच्याशी बळजोरीने शारीरिक संबंध निर्माण केले. या घटनेचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची, तिला आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली.
२. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
३. गुन्हा नोंद झाल्यापासून अभिषेक कळमकर पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांत पोलीस पथके पाठवून ते सापडले नाहीत.
४. कळमकर यांच्यावर आणखी एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. त्यासंबंधीची तक्रार भिंगार कँप पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !