
चंद्रपूर, २० एप्रिल (वार्ता.) – नाशिक येथील टी.सी.एस्. आस्थापनात उघडकीस आलेला प्रकार हा केवळ महिलांची छेडछाड करण्याचा नसून तो खोलवर पसरलेल्या विखारी जिहादी मानसिकतेचा आणि संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. या आस्थापनामध्ये काम करणार्या हिंदु महिलांची छेड काढणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे, धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणे, गोमांस खाण्यास सक्ती करणे इत्यादी प्रकार घडले आहेत, तसेच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या महंमद अयाज आणि महंमद तन्वीर या नराधमांनी १८० हून अधिक हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे कृत्य केवळ लैंगिक शोषणाचे नसून अनेक युवतींची समाजात अप्रतिष्ठा निर्माण करून त्यांचे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त करण्याचा संघटित प्रकार आहे. अशा नराधमांना कोणतीही दयामाया न दाखवता लवकरात फाशीची शिक्षा द्यावी, याविषयीचे निवेदन चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी डी.एस्. कुंभार आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
गायत्री परिवार, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. याच विषयाचे निवेदन राजुरा, मूल आणि घुग्गुस येथेही देण्यात आले.
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !