अहिल्यानगर येथील लोणी पोलीस ठाण्यात ‘सकल हिंदु वारकरी समाजा’कडून निवेदन

अहिल्यानगर – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या वारकरी साधू-संतांच्या विषयी अपमानस्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी धर्माचार्यांचा उल्लेख ‘घुसखोर’ असा करून वारकरी समाजाच्या श्रद्धा दुखावल्या आहेत. या विधानामुळे समाजात सामाजिक अस्थिरता निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. या प्रकाराची नोंद घेऊन लवांडे यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘सकल हिंदु वारकरी समाज’ (प्रवरा परिसर) यांच्या वतीने लोणी पोलीस ठाण्यात १८ एप्रिलला देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, विकास लवांडे यांनी जाणीवपूर्वक वारकरी संतांची अपकीर्ती करण्याच्या हेतूने अशी विधाने केली आहेत. हे विधान केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान करणारे आहे. या वेळी ‘वैदिक हिंदु वारकरी बहुउद्देशीय सेवा संघा’चे पदाधिकारी आणि सकल हिंदु वारकरी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !