९ धर्मांध मुसलमानांना अटक, पोलिसांनी काढली धिंड
रमझानच्या महिन्यातच पीडितेचे केले होते अपहरण

कर्णावती (गुजरात) – खेडा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करणार्या ९ मुसलमान तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. परवेज अनवर खान उपाख्य मुनावर खान पठाण, माहिर पठाण, फैजान पठाण, तौफीक पठाण, साहिल लियाकत खान, अयान पठाण, मोईन, मारून आणि सलमान पठाण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून
एक आरोपी अद्याप पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, रमझान महिन्यात ईदच्या २ दिवस आधी आरोपींनी पीडितेचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी २-३ दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
१. १७ वर्षांच्या पीडितेला ३ वर्षांपूर्वी त्याच गावातील परवेज पठाण नावाच्या तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तो तिला ‘ब्लॅकमेल’ करू लागला. तसेच परवेजने त्याच्या मित्रांसमवेतही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला.
२. पीडितेने पोलिसांना सांगितले की, नुकत्याच झालेल्या रमजान महिन्यात ईदच्या २ दिवस आधी आरोपींनी तिला बळजोरीने समवेत नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला गप्प रहाण्यास भाग पाडले जात होते.
३. आरोपींना कह्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची सार्वजनिक ठिकाणी धिंड काढली. या वेळी मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले होते. त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court