(मोरी म्हणजे रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी पाईप टाकून केलेली व्यवस्था)

सावंतवाडी – वेर्ले मुख्य रस्ता ते सटवाडीकडे जाणार्या मार्गावर एका ठिकाणी मोरी बांधण्यात आली. यासाठी अंदाजे ४ लाख ९९ सहस्र ८६३ रुपयांचे प्रावधान करण्यात आले होते. या कामाचे दायित्व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे (सावंतवाडी) आहे; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होताच मोरी एका बाजूने खचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हे बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हा सार्वजनिक पैशांचा उघड उघड अपव्यय आहे. या बांधकामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून दोषींवर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच संबंधित कामाचे देयक ठेकेदाराला देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कदम यांनी केली आहे.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !