
कुडाळ – येथील नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला १५ एप्रिल या दिवशी दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि अग्नीशमन दल यांचे सायंकाळपर्यंत प्रयत्न चालू होते.
दुपारी अडीच वाजता कचरा डेपोतून धूर येण्यास प्रारंभ झाला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. कचर्याचे ढीग असल्याने आगीचा प्रसार वेगाने झाला.
आगीची भीषणता पाहून कुडाळच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, नगरसेवक नीलेश परब आणि नगरसेविका श्रेया गावंडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पहाणी केली. उन्हाची तीव्रता आणि वार्याचा वेग यांमुळे आग विझवतांना अडचणी येत असल्याचे समजते.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू