तोटा टाळण्यासाठी उपाययोजना काढणार !
कार्यक्षम अधिकर्यांच्या नियुक्तीवर दिला जाणार भर !

मुंबई – वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात एस्.टी. महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एस्.टी. महामंडळाचा दैनंदिन तोटा १ कोटी ६० लाख रुपये इतका आहे. येत्या काळात एस्.टी. महामंडळाला (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला) तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तोट्यात असलेल्या विभागाचे सखोल अन्वेषण करून त्याची कारणमीमांसा समजून घेण्यात येईल. तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये कार्यक्षम अधिकार्यांची नियुक्ती करण्यावर भर दिला जाणार आहे. १५ एप्रिल या दिवशी मुंबई सेंट्रल येथील एस्.टी. महामंडळाच्या मुख्यालयात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एस्.टी.च्या अधिकार्यांसमवेत एस्.टी.ला तोट्यातून बाहेर काढण्याविषयी चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी एस्.टी.चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांसह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी प्रताप सरनाईक यांनी एस्.टी.ला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.
राज्यातील परिवहन मंडळाच्या एकूण ३१ विभागांपैकी केवळ ८ विभाग लाभात आणि उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत. यामध्ये जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे विभाग लाभात होते. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या मोठ्या विभागांना तोटा झाला. वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात एस्.टी.चे एकूण उत्पन्न ११ सहस्र ४७५ कोटी रुपये इतके आहे आणि व्यय १२ सहस्र ६६ कोटी रुपये झाला, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात राबवला जाणार सुधारणा आराखडा !
येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसगाड्या आणि मनुष्यबळ यांचा अधिकाधिक कार्यक्षम उपयोग करून तोटा भरून काढणे, हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. एस्.टी. महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी उपयोग आणि दायित्वाची निश्चिती या तत्त्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबवण्यात येणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक