
नवी मुंबई, १४ एप्रिल (वार्ता.) – वाशी येथील पदपथावर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय थाटल्याने पादचार्यांना येथून चालतांना अडचण येते.
येथील सेक्टर ९ ते सेक्टर १२ पर्यंत मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावर दिवसभर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. दुकानदारांनीही दुकानांसमोरील ५ ते १० मीटरपर्यंतच्या सामासिक जागेमध्ये दुकानातील वस्तूंचे प्रदर्शन लावले आहे. काही दुकानदारांनी ही जागा अन्य व्यावसायिकांना भाड्याने दिली आहे. पादचार्यांना पदपथावरून चालणे शक्य नसल्याने ते रस्त्यावरून जातात. परिणामी रस्त्यावरील वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघात घडत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत भुरट्या चोरांचे फावते. ‘वरिष्ठ अधिकार्यांनी यात लक्ष घालून रहिवाशांना फेरीवालामुक्त पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !