त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार !
आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी !

नाशिक – त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांसह गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) यांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधितांवर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. (जोपर्यंत मंदिरांचे व्यवस्थापन साधना करणारे हिंदू आणि धर्माभिमानी भक्त यांच्या हाती येत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. पोलिसांनी यामागील संपूर्ण साखळी नष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत ! देवाच्या दरबारात सर्वांना समान न्याय मिळावा, हीच अपेक्षा ! – संपादक) पुरुषोत्तम कडलग, तसेच गोटीराम पेहरे यांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती ए.जी. बेहरे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. अभिषेक कडलग सध्या फरार आहे.
🚨 Black Marketing of Darshan at Trimbakeshwar Temple! 🚨
Shocking revelations from Trimbakeshwar Temple – a leader from the NCP (Sharad Pawar faction) and a Temple Trust trustee are among two arrested in a darshan black marketing case. Both have been remanded to police custody… pic.twitter.com/ChmWfR5PX7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2026
त्र्यंबकेश्वर मंदिरात अतीमहनीयांच्या प्रवेशासाठी कडक नियम आहेत. सुरक्षारक्षक कुणालाही थेट प्रवेश देत नाहीत. त्यासाठी विश्वस्तांची अनुमती किंवा दूरभाष आवश्यक असतो. नोंदवहीमध्ये भाविकाचे नाव, कुणाच्या सांगण्यावरून प्रवेश दिला, याची सविस्तर नोंद करणे बंधनकारक असते. ‘असे असतांना बाहेरील व्यक्ती भाविकांना थेट मंदिरात कशी नेऊ शकते ?’, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
रक्कम महत्त्वाची नसून अन्य काही लोकांचा सहभाग पडताळणे आवश्यक ! – सरकारी अधिवक्ता
या वेळी सरकारी अधिवक्त्यांनी युक्तीवाद करतांना सांगितले की, देवस्थान १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देवदर्शनासाठी विश्वस्त बनावट व्यक्तीच्या नावाने नोंदणी करून भोळ्या-भाबड्या नातेवाइकांची फसवणूक करतात. नातेवाइकांच्या नावाने ही टोळी चालवली जाते. यात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का ? ते पडताळणे आवश्यक आहे. जगभरात त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख असून काही विधी केवळ येथेच होतात. आधीच नाशिकचे नाव खराब होत असतांना त्यात ही एक भर पडली आहे.’’
काय आहे प्रकार ?
त्र्यंबकेश्वर मंदिरात ११ एप्रिल या दिवशी पंचवटी येथील भाविक अनंता मेहंदळे आणि त्यांचे मित्र दर्शनासाठी गेले होते. १० मिनिटांत दर्शनाचे आमीष दाखवून संशयितांनी त्यांच्याकडून ३ सहस्र रुपये रोख उकळले. २०० रुपयांचा अधिकृत पास असतांना भाविकांकडून ३ सहस्र ते १२ सहस्र रुपयांपर्यंत पैसे मागितले जातात. देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत ‘पेड (पैसे देऊन) दर्शन’ सुविधा नसतांनाही भाविकांची अशी फसवणूक केली जाते. या प्रकरणी अनंता मेहंदळे यांनी तक्रार प्रविष्ट केली.
पोलिसांनी केले ‘स्टिंग ऑपरेशन’ (छुप्या पद्धतीने केलेली मोहीम) !
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे अतीमहनीयांच्या दर्शनासाठी २०० रुपये शुल्क आहे. तात्काळ दर्शनासाठी काही दलाल काम करत होते. मंदिर समितीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाले होते. भाविकांना कसे लुटले जाते, याचे आम्ही ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. पूर्व दरवाजातून ट्रस्टच्या अधिकाराचा वापर करून पैसे घेतलेल्या भाविकांना सोडले जात होते. ३ सहस्र रुपये घेऊन १०० ते १५० लोकांना सोडले जात होते. ज्यांनी विश्वस्तपदाचा गैरवापर केला, त्यांची चौकशी होणार आहे. सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवले जातील.
प्रतिक्रिया
१. शरद पवार यांनी नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यानेच देवस्थानात असा भ्रष्टाचार चालू आहे ! – श्री. तुषार भोसले, प्रमुख, भाजप आध्यात्मिक आघाडी.
२. विश्वस्त निवड प्रक्रियाच आर्थिक व्यवहारातून झाली असून कडलग यांच्यासह तिघांनी कोट्यवधी रुपये देऊन हे पद मिळवले आहे ! – ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !