संपत्तीच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी
काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रीमंडळ यांनी त्यांची संपत्ती घोषित केली आहे. नेपाळच्या कायद्यानुसार मंत्रीपद मिळाल्यानंतर ६० दिवसांच्या आत संपत्ती घोषित करणे बंधनकारक आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या बँक खात्यात १ कोटी ४६ लाख रुपये आणि १९० तोळे सोने असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. त्यांनी ही रक्कम फेसबुक आणि यू ट्यूब यांद्वारे कमावल्याचे आणि उर्वरित संपत्ती वडिलोपार्जित असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांसह मंत्रीमंडळातील मंत्रीही गर्भश्रीमंत असल्याचे दिसून आले. यानंतर नेपाळमध्ये त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेल्या जनआंदोलनानंतर बालेन शाह सत्तेवर आले होते. आता समोर आलेल्या अफाट संपत्तीमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. १३ एप्रिलला काठमांडूमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने करत या संपत्तीच्या स्रोतांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘एवढी संपत्ती आली कुठून?’ असा प्रश्न आता सामान्य नेपाळी नागरिक विचारत आहे. राजकीय तज्ञांच्या मते, संपत्ती घोषित करणे हा पारदर्शकतेचा भाग असला, तरी उत्पन्नाचे ठोस पुरावे सादर केल्याविना बालेन शाह यांना या वादातून बाहेर पडणे कठीण जाईल.

‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin