अर्ज प्रक्रिया ऑनलाईन, ८ घंट्यांत अर्ज संमत होणार !

मुंबई – मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय साहाय्यता कक्ष यांसाठी यापुढे अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. येत्या ४ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन होणार आहे. यामुळे अर्ज संमत होण्याची प्रक्रिया अवघ्या ८ घंट्यांमध्ये होईल. वैद्यकीय साहाय्यासाठी यापुढे रुग्ण नव्हे, तर संबंधित रुग्णालयांकडून अर्ज घेण्यात येणार आहे, अशी माहिती या कक्षांद्वारे देण्यात आली.
मागील वर्षभरापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय साहाय्यता कक्ष यांमध्ये नाविन्यपूर्ण पालट करण्याचे काम चालू आहे. रुग्णाने रितसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन ती कागदपत्रे मुख्यमंत्री साहाय्यता निधी कार्यालयाकडे संमतीसाठी पाठवणार आहे. नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज संमतीची प्रक्रिया कार्यालयीन ८ घंट्यांत पूर्ण होईल, असे कक्षांद्वारे सांगण्यात आले.
रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित ! – रामेश्वर नाईक, कक्षप्रमुख
रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी १८०० १२३ २२११ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४० सहस्र रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ सहस्र ५०० रुपयांचे वैद्यकीय साहाय्य देण्यात आले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !