उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रिया राजंदेकर ही या पिढीतील एक आहे !
फोंडा, गोवा येथे रहाणारी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १५ वर्षे) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन साधना करते. तिच्यामध्ये ‘सकारात्मकता, स्थिरता, तसेच शिकण्याची आणि विचारण्याची वृत्ती’ आदी गुण आहेत. १३.४.२०२६ या दिवशी तिचा १५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तिच्या समवेत सेवा करणार्या साधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. आनंदी आणि सकारात्मक
‘श्रिया नेहमी नम्र, शांत, आनंदी आणि हसतमुख असते. तिच्यामुळे वातावरण सकारात्मक आणि आनंदी होते.
२. उत्तम आकलनक्षमता असल्याने वयाने लहान असूनही विविध सेवा शिकून त्या सर्वांगसुंदर रीतीने करणे
आश्रमात श्रियाने साधनेच्या अंतर्गत विविध सेवा शिकून घेतल्या आहेत. एखादी नवीन सेवा आल्यास श्रिया लगेच ती सेवा समजून घेते आणि त्या सेवेची व्याप्ती काढते. एकंदरीतच तिच्या वयाच्या मानाने तिला लवकर आकलन होते. काही सेवा थोड्या क्लिष्ट असतात; पण त्या सेवाही ती लवकर समजून घेते. एखाद्या साधकाला काही वर्षे साधना केल्यावर जे समजते, ते तिला अल्प वेळेत समजते. त्यामुळे ती सेवा सर्वांगसुंदर आणि समयमर्यादेत करण्याचा प्रयत्न करते.
३. श्रियामध्ये उत्तम नियोजनकौशल्य आणि उपजत नेतृत्वगुण असणे
उत्तरदायी साधकांनी सांगितल्याप्रमाणे ती प्रत्येक सेवा करण्याचा प्रयत्न करते. ‘सेवेचे नियोजन कसे करायचे ?’, हे तिला एकदा सांगितले की, ती ते चांगल्या पद्धतीने करते. ‘सेवांचे स्वरूप, त्यांना लागणारा कालावधी, तसेच सेवेसाठी लागणारे साहित्य’ आदींविषयी विचार करून ती नियोजन करते.
४. प्रेमभाव आणि समजूतदारपणा या गुणांनी श्रियाने साधकांना आपलेसे करणे
श्रिया लहान असूनही इतरांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आधार देते. ती बालसाधकांची काळजी घेते, तसेच वयस्कर साधकांचीही विचारपूस करते. साधकांना कोणतेही साहाय्य करण्यास ती तत्पर असते. अशा प्रकारे तिने सर्वांना आपलेसे केले आहे. त्यामुळे ती सर्व वयोगटातील साधकांची लाडकी आहे.
५. अंतर्मुख असणे
श्रियाच्या वागण्या-बोलण्यातून तिचा अंतर्मुखता हा गुण लक्षात येतो. तिला काही सांगितले, तर ‘साधनेच्या दृष्टीने हा विचार आणि कृती योग्य आहे का ?’ याचा ती अभ्यास करते. ‘स्वतःकडून काही चुकत नाही ना ?’ याकडे सतर्कतेने लक्ष ठेवून ती सेवा करते. वयाने लहान असूनही तिचे दृष्टीकोन योग्य आणि सुस्पष्ट असतात. ती ‘अनावश्यक बोलणे, विनाकारण भ्रमणभाष हाताळणे, विचारांत रमणे’ आदी गोष्टी कधीच करत नाही. अन्य साधकांकडून असे होत असल्यास ती त्यांना मोकळेपणाने सांगते.
६. तत्त्वनिष्ठता
श्रिया इतरांना चुका सांगतांना तत्त्वनिष्ठतेने; पण त्यांना न दुखवता प्रेमाने सांगते.
७. भाव
७ अ. प.पू. गुरुदेवांप्रती भाव : श्रियामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आहे. ‘प्रत्येक कृती आणि विचार श्री गुरूंना अपेक्षित असावा’, असा तिचा भाव असतो.
७ आ. दैवी बालकांचा दैवी सत्संग भावपूर्ण रीतीने घेणे : श्रियाकडे दैवी बालकांचा दैवी सत्संग घेण्याची सेवा आहे. ती सत्संगात बोलत असतांना तिचा आवाज अत्यंत मृदू असतो. सत्संग घेण्याची सेवा ती अत्यंत भावपूर्ण रीतीने करते. ते पाहून ‘ती सामान्य बालिका नसून दैवी बालिका आहे’, हे लक्षात येते.
श्रियातील आध्यात्मिक स्तरावरील गुण पाहून ‘श्रिया दैवी बालिका आहे’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वाक्याची नेहमी आठवण होते. तिच्यातील दैवी गुण ध्यानात येऊन ते आत्मसात करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत. ‘आम्हाला श्रियाचा सहवास दिला. तिच्याकडून शिकण्याची संधी दिली. याबद्दल आम्ही सर्व जण प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२६)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
दैवी बालिकांच्या उपस्थितीत झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगातील क्षणमोती !
विविध कलांची आवड असणारी आणि आईला सेवेत साहाय्य करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची भोसरी (पुणे) येथील कु. साची कुलकर्णी (वय १५ वर्षे) !
देवाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची नागपूर येथील चि. सुमिरा सचिन सहारे (वय ४ वर्षे) !
सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !
शिकण्याची वृत्ती आणि नामजपाची आवड असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय १४ वर्षे) !