शेकडो पोलिसांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हिडमा मडावी याच्यावर आधारित ‘जंगल का राजा हिडमा’, हे नाटक सादर !

पुणे – येथील समाजकल्याण वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शेकडो पोलिसांच्या हत्येचा सूत्रधार (मास्टरमाइंड) आणि कुख्यात नक्षलवादी हिडमा मडावी याच्यावर आधारित ‘जंगल का राजा हिडमा’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातून थेट आतंकवाद्याचे उदात्तीकरण करण्यात आल्याने पुण्यात ‘शहरी नक्षलवादा’ची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ?, हे लक्षात येते.
काय आहे हा राष्ट्रद्रोही प्रकार ?
या नाटकातील गाण्याचे शब्द अत्यंत प्रक्षोभक आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान करणारे आहेत. ‘ओ बंदूकवाले हिडमा, वापस आजा मडावी हिडमा, क्रांती का वीर है तू हिडमा…’, असे म्हणत एका मारेकर्याला ‘क्रांतीवीर’ ठरवण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘कोर्ट के चोरो ने घेरा डाला’, असे म्हणत न्यायदेवतेचा आणि ‘ग्रीन हंट बंदूक से हमको मारा’, असे म्हणत नक्षलवाद्यांविरुद्ध लढणार्या सुरक्षा दलांचा अवमान करण्यात आला आहे.
पुण्यातील तरुणांना आतंकवादी कृत्यांकडे वळवण्याचे मोठे षड्यंत्र !या प्रकारावर हिंदुत्वनिष्ठ तुषार दामगुडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गोंडस नावाखाली पुण्यातील निष्पाप तरुणांना आतंकवादी कृत्यांकडे वळवण्याचे हे मोठे षड्यंत्र आखले जात आहे का ?, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुणे महानगरपालिका, पुणे शहर पोलीस आणि आतंकवादविरोधी पथक यांनी याची गंभीर नोंद घेऊन यामागे कुणाचा ‘नक्षलवादी मेंदू’ कार्यरत आहे ?, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. |
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक