
मुंबई – सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर १३ एप्रिल या दिवशी दादर येथील शिवाजी पार्क येथील कै. भागोजी कीर हिंदु स्मशानभूमीमध्ये शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी ५.१५ वाजता त्यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला. पोलिसांनी २१ फैरी झाडून आशा भोसले यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली. या वेळी गायक सुदेश भोसले आणि गायक अनुप जलोटा यांनी स्वरांजली अर्पण करत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Took antim darshan and offered my humble tributes to the legendary singer, Padma Vibhushan, Maharashtra Bhushan, late Ashatai Bhosle, at Chhatrapati Shivaji Maharaj Park, Mumbai today. The mortal remains of Ashatai Bhosle were laid to rest with full State Honours. Met and… pic.twitter.com/yn33qYk2P5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2026
सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आशा भोसले यांचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत आणण्यात आले. मार्गामध्ये, तसेच स्मशानभूमीच्या परिसरात अंत्ययात्रा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महापौर सौ. रितू तावडे, मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, राजकीय नेते यांच्यासह संगीत, चित्रपट, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांनी स्मशानभूमीत उपस्थित राहून आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
| वाचा → संपादकीय : स्वरांचे चिरतरुण लेणे ! |
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री