बांगलादेशात २ घटनांमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील रंगपूरच्या दासपाडा बाजार परिसरात ११ एप्रिलला रकीब हसन या तरुणाची हत्या झाल्यानंतर मुसलमानांच्या जमावाने हिंदूंची घरे आणि त्यांची दुकाने यांची तोडफोड केली. पोलिसांच्या माहितीनुसार दिशाभूल करण्यासाठी ही कारवाई तिसर्‍या पक्षाकडून करण्यात आली होती.

रकीब हसन याच्या आईने स्पष्ट केले की, या हत्येत हिंदु समाजाचा कोणताही संबंध नव्हता. रकीबची हत्या अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या महंमद मोमिन याने वैयक्तिक वादातून केली होती.

इस्लामच्या अवमानावरून मौलवीची हत्या : हिंदूंच्या घरांनाही केले लक्ष्य

कुश्तिया येथे इस्लामचा अपमान केल्याचा आरोप करत मुसलमानांच्या जमावाने शाळेतील शिक्षक मौलवी शमीम रजा जहांगीर यांची हत्या केली. आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या दरबाराला आग लावली आणि त्यांच्या ७ अनुयायांना गंभीररित्या घायाळ केले. येथेही काही हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.

यावर्षी ३ महिन्यांत अल्पसंख्यांकांवरील आक्रमणाच्या १३३ घटना

बांगलादेश ‘हिंदू बौद्ध ख्रिस्ती एकता परिषदे’च्या आकडेवारीनुसार चालू वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यांतच धार्मिक हिंसेच्या १३३ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. सद्य:स्थिती पहाता बाधित भागांमध्ये पोलीस आणि धडक कृती दल यांना तैनात करण्यात आले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात सत्ता कुणाचीही असो, हिंदूंना धर्मांध मुसलमानांकडून लक्ष्य केले जाते. हे आता नित्याचे झाले आहे !