काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांचे संतापजनक विधान
वारकरी संप्रदायात फूट पाडण्याचे विधान करणारे शरद पवार यांचे काँग्रेसकडून समर्थन

मुंबई – वारकरी संप्रदायात ‘प्रतिगामी’ विचारांच्या लोकांनी शिरकाव केला आहे, असे विधान करून हिंदु समाजात फूट पाडणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचे काँग्रेसने समर्थन केले आहे. ‘हिंदु धर्मात नास्तिकता मान्य आहे, तसेच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते’, अशी गरळ ओकून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हिंदुत्वाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक माध्यमांवर त्यांनी हे मत मांडले. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञानाधिष्ठित हिंदुत्वाचा पुरस्कार केला; परंतु त्यांनी हिंदु धर्माचा कधीही त्याग केला नाही. काँग्रेसने केवळ राजकारणासाठी त्यांना ‘नास्तिक’ ठरवून हिंदूंच्या श्रद्धांशी खेळ चालवला आहे ! – संपादक)
सचिन सावंत म्हणाले की, शरद पवारांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचारांच्या भोंदू बाबा, तथाकथित स्वयंघोषित आचार्य आणि विद्वेषपूर्ण विचारधारा पसरवणार्या कीर्तनकारांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (शरद पवारांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांची सूची बनवण्याचे वक्तव्य करणे आणि काँग्रेसने त्याचे समर्थन करणे, हा वारकरी चळवळीत फूट पाडण्याचाच प्रयत्न आहे. संतांच्या अभंगांतून समाजप्रबोधन करणार्या कीर्तनकारांना ‘भोंदू’ किंवा ‘घुसखोर’ म्हणणे, हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अवमान आहे ! – संपादक)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध : रासायनिक लेपनामुळे मूर्तीची हानी !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक