सातारा जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन !

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या अंतर्गत २१ जिल्ह्यांतील ३०८ मदरशांना ५० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. हा निर्णय रहित करण्याच्या मागणीसाठी येथील हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अमोल गोसावी, हिंदु महासभेचे उमेश गांधी, ‘श्रीपंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तुपे, श्री योगेश्वर महादेव मंदिराचे अजित सुपेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण प्रमुख सचिन वालकर, हेमंत सदावर्ते, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, हेमंत सोनावणे, रणरागिणी शाखेच्या सौ. सुलभा लोंढे आदी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, ‘राज्यशासनाने धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचा आदर ठेवून सर्व समाजघटकांमध्ये समानतेने वागावे. विशिष्ट धार्मिक संस्थांसाठी शासकीय निधी दिला जात असल्यास त्याच न्यायाने वेदपाठशाळा, वारकरी शिक्षण संस्था, तसेच इतर हिंदु धार्मिक शिक्षण संस्थांनाही समान आर्थिक साहाय्य मिळाले पाहिजे. मदरशांचा आर्थिक व्यवहार, विद्यार्थी संख्या आणि दिलेले अनुदान यांची चौकशी व्हावी. धार्मिक शिक्षण देणार्या संस्थांसाठी शासनाने समान निकष लागू करावेत. सार्वजनिक निधीचा उपयोग विशिष्ट धार्मिक वर्गासाठीच होणे अन्यायकारक आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करू.’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !