बोकारो (झारखंड) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

बोकारो (झारखंड) – अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते. नियमित साधना केल्याने मन स्थिर रहाते आणि कामात एकाग्रता अन् संतुलन येते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे श्री. रणजित प्रसाद यांनी शिक्षकांना मार्गदर्शक करतांना केले. येथील पू. जगजीवन महाराज सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिक्षकांसाठी ३ दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले. या प्रवचनाचा २५ शिक्षकांनी लाभ घेतला. या वेळी सर्व शिक्षकांनी विषय अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. ‘संस्थेने अशी प्रवचने नियमितपणे आयोजित करावीत’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या वेळी सनातनचे साधक श्री. रणजित सिंह यांनी उपस्थितांना संस्थेचा परिचय करून दिला.

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !