भोंदू खरातची पुन्हा चौकशी !

शिर्डी – साई संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणी राहाता न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दोषारोपपत्रातून नाव वगळण्यात आलेला संशयित भोंदू अशोक खरात याची आता पुन्हा सखोल चौकशी होणार आहे. पुरावे अपुरे असल्याचे कारण देत पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु दिवटे यांचे भाऊ राजेंद्र दिवटे यांनी याला आक्षेप घेऊन पुन्हा या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशामुळे शिर्डी पोलीस खरातच्या भूमिकेचे नव्याने अन्वेषण करणार आहेत.

विकास दिवटे यांनी जून २०२२ मध्ये सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सिन्नर येथील भोंदू अशोक खरात याचा स्पष्ट उल्लेख होता. सासरच्या मंडळींनी दिवटे यांना खरातकडे नेले होते, तिथे त्यांना धमकावून प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला होता. पोलिसांनी खरातचे नाव आरोपपत्रातून वगळल्यामुळे दिवटे यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी